Video : सीआरपीएफच्या महिला कॉन्स्टेबलचे देशभक्तीपर जोशपुर्ण भाषण एकदा बघाच

सीआरपीएफच्या एका महिला कॉन्स्टेबलचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये महिला कॉन्स्टेबल देशाच्या  प्रती असलेली भावना आणि देशाची रक्षा करणाऱ्या जवानांची विडंबना मांडत आहे. या महिला कॉन्स्टेबलचे नाव खुशबू चौहान आहे. त्यांचे हे जोशपुर्ण भाषण सोशल मीडियावर हिट होत आहे.

सीआरपीएफमध्ये खुशबू चौहान या 23 व्या बटालियनचा भाग आहेत. त्यांनी आपल्या भाषणात देशाच्या विरोधात काम करणाऱ्या शक्ती आणि नक्षलवाद्यांच्या विरोधात आवाज उठवला आहे. राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाच्या कार्यक्रमात 27 सप्टेंबरला इंडो-तिबेटियन बॉर्डर पोलिस (आयटीबीपी) कडून एका वादविवाद स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी खुशबू चौहान यांनी हे भाषण केले.

Must listen !

Posted by अविनाश चतुर्वेदी on Thursday, October 3, 2019

देशातील मानवाधिकार लक्षात घेता दहशतवाद आणि उग्रवादाच्या समस्येला कसे तोंड द्यायचे, हे त्या या भाषणात सांगत आहे. देशाची रक्षा करणाऱ्या जवानांना देखील स्वतःचे प्राण गमवावे लागतात. याचबरोबर जेएनयू आणि इतर ठिकाणी भारत विरोधी नारे देण्यात आलेल्या घटनांबद्दलही त्या बोलल्या.

चौहान म्हणाल्या की, सुरक्षा दलात भरती होताना एक इंच जरी उंची कमी असेल तरी स्विकारले जात नाही. मग जेव्हा आपल्या जवानांचे शरीर छिन्न-विछिन्न केले जाते. तेव्हा कुटुंबाने आपल्या मुलांच्या शरीराचे ते तुकडे कसे स्विकारयचे ?

Leave a Comment