भारतीय वायुसेने जारी केला एरिअल स्ट्राइकचा व्हिडिओ


नवी दिल्ली – हवाई दलाच्या १२ मिराज २००० जेट्सने २६ फेब्रुवारी २०१९ रोजी नियंत्रण रेषा पार करत बालाकोटमध्ये जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी चौक्यांवर हल्ला करत त्यांचा खात्मा केला. जवळपास २०० ते ३०० दहशतवादी या हल्ल्यादरम्यान मारले गेले. भारतीय वायु सेनेकडून आता या हल्ल्याचा एक प्रमोशनल व्हिडिओ जारी करण्यात आला आहे.


यामध्ये भारताची लडाऊ विमाने उडण्यापासून ते निशाणा साधण्यापर्यंतचे अनेक प्रसंग दाखवण्यात आले आहेत. हा व्हिडिओ दिल्लीमध्ये झालेल्या हवाईदल दिनानिमित्त झालेल्या एका पत्रकार परिषदेमध्ये जारी करण्यात आला आहे. या पत्रकार परिषदेला हवाईदल प्रमुख एअर चीफ मार्शल राकेश कुमार सिंग भदौरिया यांनी संबोधित केले.

२६ फेब्रुवारीच्या पहाटे पावणेचार वाजता भारतीय हवाई दलाने पाकिस्तानातील बालाकोट येथील जैश-ए-महम्मदच्या तळावर हवाई हल्ले करुन हे दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले होते. केंद्रीय राखीव पोलीस दलाचे ४१ जवान पुलवामा येथे ‘जैश-ए-मोहम्मद’च्या भीषण हल्ल्यात शहिद झाले होते त्याला उत्तर म्हणून ही कारवाई करण्यात आली होती.

Leave a Comment