अश्लील शेरेबाजी करणाऱ्याला महिला अँकरने दिले असे उत्तर


फुटबॉलचे चाहते अनेकदा मैदानात घुसत हुल्लडबाजी करून गोंधळही घालतात. असाच काहीसा प्रकार इटलीतील एका लीगदरम्यान घडला. एका फुटबॉल चाहत्याने महिला अँकरवर अश्लील शेरेबाजी केली. नेपोली आणि ब्रेशिया यांच्यात इटलीतील सान पाउलो स्टेडियमवर सामना सुरू होता. इटालियन स्पोर्ट्स अँकर डॉयल्टा लेओटा स्टेडियममध्ये या सामन्यावेळी होती. नेपोली फुटबॉल क्लबच्या चाहत्यांनी तिला पाहताच शेरेबाजी करायला सुरूवात केली. यावेळी एका चाहत्याने तर तिला टीशर्ट काढण्यास सांगितले.


अँकर डॉयल्टा लेओटाने नेपोलीच्या चाहत्यांच्या अपशब्दातील टिप्पणीला सहजपणे उत्तर दिले. कोणताही आक्रमकपणा न दाखवता तिने हसत हसत अंगठ्याने इशारा करत नाही म्हणून सांगितले. सध्या सोशल मीडियावर डॉयल्टा लेओटाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.


लेओटा इटलीतील प्रसिद्ध व्यक्तींपैकी एक आहे. तिचे सोशल मीडियावरही 4.5 मिलियन चाहते आहेत. 2009 मध्ये मिस इटली स्पर्धेत तिने मिस एलिगेंट पुरस्कार पटकावला होता. 2017 मध्ये इंटरनेटवर तिचा न्यूड फोटो व्हायरल झाला होता. हॅकर्सने तिचे फोटो चोरले होते. त्यानंतर इंटरनेटवर अपलोड केले होते.

Leave a Comment