दूरदर्शनच्या अधिकाऱ्याचे पंतप्रधान मोदींचे भाषण दाखवले नाही म्हणून निलंबन


चेन्नई – चेन्नई आयआयटीमधील पदवीदान समारंभासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे उपस्थित होते. त्यांनी यावेळी केलेल्या भाषणाचे प्रक्षेपण दूरदर्शन केंद्राच्या सहाय्यक संचालकांनी रोखल्यामुळे त्यांचे निलंबन करण्यात आले आहे. या अधिकाऱ्याचे नाव आर. वसुमथी असे आहे.

दोन दिवसीय पदवीदान समारंभाचे आयोजन चेन्नई येथील आयआयटीमध्ये करण्यात आले होते. पंतप्रधान मोदीदेखील यावेळी उपस्थित होते. त्यांचे भाषण सुरु झाल्याच्या थोड्याच अवधीत, मोदींच्या भाषणाचे ‘डीडी पोडीगई’ या दूरदर्शन केंद्रातून थेट प्रक्षेपण होत नसल्याचे लक्षात आले. त्यादृष्टीने चौकशी केली असता, हे प्रक्षेपण तेथील सहाय्यक संचालक आर. वसुमथी यांनी रोखल्याचे समजले. त्यानंतर त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली.

ही कारवाई प्रसार भारतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी शशी शंकर यांनी केली. सध्या आर. वसुमथी हे दूरदर्शन कार्यालयाच्या जागेत राहत आहेत. वेळ आल्यास त्यांना राहते घरदेखील सोडावे लागणार आहे. दरम्यान, प्रसार भारतीकडून निलंबनाचे कारण हे शिस्तभंग सांगण्यात येत आहे.

Leave a Comment