तब्बल 12 कोटींमध्ये बनवण्यात आला आहे हा दुर्गा मंडप

कोलकातामध्ये दुर्गा पुजेसाठी तयार करण्यात आलेल्या मंडपांचे वैभव जगभरात चर्चित असतात. कोलकातामधील वीआयपी रोडवरील श्रीभूमी स्पोर्टिंग क्लबने देशातील सर्वात मोठा दुर्गा मंडप तयार केला आहे. मौर्यकालीन महालाच्या थीमवर 100 फूट उंच मंडप बनवण्यासाठी आणि देवीला सजवण्यासाठी 12 कोटी रूपये खर्च आला आहे.

(Source)

देवी दुर्गा, सरस्वती, लक्ष्मी, कार्तिकेय आणि गणपतीच्या मुर्त्यांना 10 कोटी रूपयांच्या दागिन्यांनी सजवण्यात आले आहे. सुरक्षेसाठी 300 खाजगी आणि पोलिस कर्मचाऱ्यांना तैनात करण्यात आलेले आहे. सीसीटिव्हीने या ठिकाणी लक्ष ठेवले जात आहे. बाबू, लाकूड आणि फायबरपासून बनवण्यात आलेल्या या मंडपाला 150 कारागिरांनी 3 महिन्यात तयार केले आहे.

(Source)

मंडपाच्या जवळच चांद्रयान-2 मिशनचे मॉडेल बनवण्यात आले आहे. वीआयपी रोडच्या दोन्ही बाजूला चांद्रयानचा संपुर्ण प्रवास पाहण्याची देखील सोय करण्यात आलेली आहे.

(Source)

पाच दिवस हा मंडप सुरू असेल. पाच दिवसात 10 लाख नागरिक या मंडपाला भेट देण्याची शक्यता आहे.

Leave a Comment