तुम्ही पाहिले आहे का ‘सांड की आँख’मधील हे गाणे


गेल्या बऱ्याच दिवसापासून अभिनेत्री तापसी पन्नू आणि भूमी पेडणेकर यांच्या ‘सांड की आँख’ या चित्रपटाची चर्चा आहे. दोघीही या चित्रपटात प्रसिद्ध शूटर दादी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या प्रकाशी तोमर आणि चंद्रो यांच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर काही दिवसांपूर्वीच रिलीज करण्यात आला होता. या चित्रपटातील ‘उमनिया’ हे गाणे आता रिलीज करण्यात आले आहे. भूमी आणि तापसीचा अनोखा अंदाज या गाण्यात पाहायला मिळतो.

या गाण्याचे बोल शेखर यांनी लिहिले आहेत. तर, संगीत विशाल मिश्रा यांनी दिले आहे. पुरुषप्रधान संस्कृतीमध्ये महिलांचे महत्व पटवून देणारे हे गाणे आहे.

आपल्या वयापेक्षा जास्त असणाऱ्या प्रकाशी आणि चंद्रो तोमर यांची भूमिका तापसी आणि भूमीने या चित्रपटात साकारली आहे. त्यांचा लूकही या चित्रपटात वेगळा दिसणार आहे. या चित्रपटाचे सुरुवातीचे शिर्षकही उमनिया असेच होते. मात्र, पुढे ते बदलून ‘सांड की आँख’ करण्यात आले. या चित्रपटाची निर्मिती अनुराग कश्यप आणि निधी परमार यांनी केली आहे. तर, या चित्रपटाचे दिग्दर्शन तुषार हिरानंदानी यांनी केले आहे. हा चित्रपट दिवाळीच्या पर्वावर रिलीज होणार आहे.

Leave a Comment