नवरात्रीत असा असतो मोदींचा आहार


नुकतीच शारदीय नवरात्राला सुरुवात झाली आहे. अनेक मंदिरांमध्ये आदिशक्तीचा जागर, देवीच्या दर्शनासाठी भाविकांची मांदियाळी पाहायला मिळत आहे.

आपल्याकडे नवरात्रात व्रत वैकल्य केल्यांना फार महत्त्व आहे. जवळपास 40 वर्षांपासून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीही नवरात्रीचे व्रत पाळत आहेत. नवरात्राला त्याच्या आयुष्यात विशेष महत्त्व आहे. देशवासीयांना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नवरात्रीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. मोदी नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये खूप संयमी आणि कडक व्रत पाळतात. अनेक दौरे, बैठका आणि कार्यक्रम असा व्यस्त दिनक्रम असला तरीही त्याचे व्रत त्यांनी आजपर्यंत कधीही मोडले नाही.

कोणतीही फळे, जेवण काही आहार ते घेत नाहीत. ते या 9 दिवसांमध्ये फक्त कोमट पाणी घेतात. त्यांनी कधीही सुट्टी घेतली नाही. त्यांनी आपले व्यस्त रुटीन सांभाळून व्रत मनोभावे पूर्ण केले. ते त्यांच्या व्रताबाबत जास्त कुठेही बोलत नाहीत. त्यांच्या म्हणण्यानुसार ते हे व्रत आत्म्याचे शुद्धिकरण करण्यासाठी आणि मनशांतीसाठी करतात असे त्यांनीच 2012 साली ब्लॉगमध्ये लिहिले होते.

पंतप्रधान मोदी सप्टेंबर 2014 रोजी नवरात्रात अमेरिका दौऱ्यावर होते. त्यांचा उपवास त्यावेळी असल्याने त्यांनी बराक ओबामांनी त्यांच्यासाठी ठेवलेल्या शाही जेवणाचा आस्वाद घेतला नाही. मोदींनी माझा उपवास आहे असे सांगत लिंबू पाणी घेतले.

मोदींच्या नवरात्राच्या व्रतामागे रंजक कथा आहे. मोदी अहमदाबादला असताना रा. स्व. संघात होते. लक्ष्मणराव इनामदार यांचा सहवास त्यावेळी त्यांना लाभला. उपवास करण्याची सवय इमानदार यांना होती. त्यांच्या व्रतापासून प्रेरणा घेऊन मोदींनी शारदीय आणि चैत्र नवरात्रीचा उपवास करण्याचे व्रत घेतले.

नरेंद्र मोदी नवरात्रामध्ये अन्न, गोड खाणे आणि फळं सोडून फक्त उकळलेलं पाणी किंवा लिंबू सरबत घेतात आणि हे व्रत दोन्ही नवरात्रात 9 दिवस न चुकता पाळतात.

Leave a Comment