लाल बहादुर शास्त्रींच्या जयंतीनिमित्ताने जाणून घेऊ त्यांच्याबद्दलच्या खास गोष्टी

आज 2 ऑक्टोंबरचा दिवस भारतासाठी ऐतिहासिक आणि सन्मानाचा दिवस आहे. आजच्या दिवशीच दोन महान व्यक्तींचा जन्म झाला होता. आज राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची 150 वी जयंती आहे तर आजच्या दिवशी जय जवान, जय किसान असा नारा देणारे देशाचे दुसरे पंतप्रधान लाल बहादुर शास्त्री यांची 116 वी जयंती आहे. आज लाल बहादुर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्ताने त्यांच्याबद्दलच्या 10 गोष्टी जाणून घेऊया.

1. लाल बहादुर शास्त्री यांचा जन्म 2 ऑक्टोंबर 1904 ला उत्तर प्रदेशच्या मुगलसराय येथे झाला होता. त्यांना घरात ते सर्वात छोटे असल्याने प्रेमाने नन्हे म्हणून बोलवले जात असे.

2. शास्त्रीजींच्या वडिलांचे नाव मंशी प्रसाद श्रीवास्तव होते आणि आईचे नाव राम दुलारी होते. शास्त्रीजींच्या पत्नीचे नाव ललिता देवी होते.

(Source)

3. लहानपणीच वडिलांचा मृत्यू झाल्यामुळे ते आपल्या आईबरोबर मिर्झापूर येथे त्यांच्या नानांच्या घरी राहायला गेले. तेथेच त्यांनी कठिण परिस्थितीमध्ये आपले प्राथमिक शिक्षण घेतले.

4. लाल बहादुर शास्त्री यांच्याबद्दल सांगितले जाते की, त्यांनी अनेक कठिण प्रसंगातही शिक्षण सोडले नाही. गावात शाळा  नसल्याने ते रोज नदीत पोहून शाळेत जात असे.

5. लाल बहादुर शास्त्री यांनी जेव्हा काशी विद्यापीठातून संस्कृतचे शिक्षण घेऊन बाहेर पडले तेव्हा त्यांना शास्त्री ही उपाधी मिळाली. तेव्हापासून त्यांनी आपल्या नावापुढे शास्त्री लावण्यास सुरूवात केली.

(Source)

6. त्यांचे लग्न 1928 ला ललिता शास्त्री यांच्याशी झाले. त्यांना दोन मुले व चार मुली होत्या.

7. 16 वर्षांचेच असताना त्यांनी शिक्षण सोडत गांधीजीं सोबत असहकार चळवळीत भाग घेतला.

8. देशातील अन्य नेत्यांप्रमाणे देशाला स्वतंत्र्य मिळवून देण्यासाठी लाल बहादुर शास्त्री यांनी 1920 मध्ये या स्वातंत्र्य लढ्यात उडी घेतली. 1921 च्या असहकार आंदोलनापासून ते 1942 भारत छोटो आंदोलनापर्यंत सर्वांमध्ये त्यांनी भाग घेतला. यावेळी त्यांना अनेकदा अटक देखील करण्यात आले होते.

(Source)

9. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ते 1951 ला दिल्लीला आले. त्यांनी रेल्वेमंत्री, वाणिज्य आणि उद्योग मंत्री, गृहमंत्री सारखी अनेक महत्त्वाची पदे संभाळली.

10. ते 1964 ला भारताचे पंतप्रधान झाले. त्यांच्याच कार्यकाळात 1965 मध्ये भारत-पाकिस्तान युध्द झाले.

 

Leave a Comment