नेदरलँड पोलिसांनी जेलमध्ये बंद केलेल्या एका छोट्या पोपटाचा फोटो सोशल मीडियावर सध्या व्हायरल होत आहे. सोशल मीडिया युजर्सने या पोपटाच्या फोटोवर कमेंट्सचा पाऊस पाडला आहे.
पोलिसांनी चोरीच्या प्रकरणात या पक्षाच्या मालकाला अटक केली त्यावेळी पक्षी त्या मालकाच्या खांद्यावर बसलेला होता.
स्थानिक पोलिसांकडे पक्ष्याला ठेवण्यासाठी पिंजरा नव्हता, त्यामुळे पोलिसांनी पक्ष्याला देखील जेलमध्येच बंद करण्यात आले. त्याला खाण्यासाठी ब्रेड आणि पाणी देखील देण्यात आले. पोलिसांनी या जेलमध्ये बंद केलेल्या पक्षाचा फोटो सोशल मीडियावर टाकल्यानंतर हा फोटा व्हायरल झाला.
पोलिसांनी सांगितले की, आम्ही चोरीच्या गुन्ह्यात एका आरोपीला अटक केली असून, अटक करताना आम्हाला एक सिक्रेट साक्षीदार सापडला. एक चोच आणि पंख आहेत. त्यांनी सांगितले की, त्याला अटक केली त्यावेळी आमच्याकडे पक्ष्याला ठेवण्यासाठी पिंजराच नाही, हे आमच्या लक्षात आले.
सोशल मीडियावर या फोटोवर अनेक युजर्सनी कमेंट्स केल्या. अनेकांनी हा ड्वार्फ पोपट आहे असे म्हटले तर, तर अनेकांनी पोपटाला कायदेशीर मदत देण्याची इच्छा देखील दर्शवली.
पोलिसांनी अटक केलेल्या आरोपीला त्याच दिवशी सोडले व त्याच्याबरोबरच त्याच्या पाळीव पक्ष्याला देखील सोडण्यात आले.