जबड्यात टरबूज पकडून पोहणाऱ्या मगरीचा व्हिडीओ व्हायरल

तुम्ही कधी मगरीला तोंडात टरबूज पकडून पाण्यामध्ये पोहताना पाहिले आहे का ? मात्र इंडियानामधील एक व्हिडीओ समोर आला असून, यामध्ये एक मगर आपल्या जबड्यात टरबूज पकडून अगदी निवांत पोहत आहे. हा व्हिडीओ लोकांना खूपच आवडत आहे.

हा व्हिडीओ मिशेल ओवरमेयरने शेअर केला असून, ते फोर्ट वायने चिल्ड्रन प्राणी संग्रहालयात काम करतात.

Nothing to see here. Just an alligator with a watermelon. Move along. 🍉😅

Posted by Mitchell Overmyer on Thursday, September 19, 2019

व्हिडीओ पोस्ट केल्यापासून आतापर्यंत 5.8 मिलियन पेक्षा अधिक जणांनी पाहिला असून, 31 हजार लाईक्स आले आहेत. तर हजारो युजर्सनी कमेंट्स केल्या आहेत. तब्बल 1.1 लाख युजर्सनी हा व्हिडीओ शेअर केला आहे.

या व्हिडीओवर युजर्सनी अनेक कमेंट्स केल्या आहेत. एका युजरने लिहिले की, मी आणि माझी मुलं हा व्हिडीओ बघून जोरजोरात हसलो. असे काहीतरी दिसण्याची आमची अपेक्षा नव्हती.

“Bomber SMASH!” Crocodilians have the strongest bite force of any animal, and Bomber our largest American Alligator at 13.5’ is showing off for Croc Week.

Posted by St. Augustine Alligator Farm Zoological Park on Thursday, August 8, 2019

याआधी देखील एका मगरीचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्यामध्ये मगर तोंड उघडून पाण्यात बसली होती. तेव्हा एक व्यक्ती येऊन मगरीच्या तोंडात टरबूज टाकतो.

Leave a Comment