विकी कौशलच्या भावाच्या आगामी चित्रपटाचा ट्रेलर रिलीज


‘मसान’, ‘संजू’, ‘राझी’ आणि ‘उरी – द सर्जिकल स्ट्राईक’ यांसारख्या चित्रपटाच्या माध्यमातून बॉलिवूडमध्ये अल्पावधीतच आपली वेगळी ओळख निर्माण करणारा अभिनेता म्हणजे विकी कौशलने तुफान लोकप्रियता मिळवली आहे. त्याच्यापाठोपाठ आता त्याचा भाऊ सनी कौशलनेही बॉलिवूडमध्ये आपली ओळख निर्माण केली आहे. तो लवकरच एका चित्रपटात मुख्य भूमिकेत झळकणार आहे. नुकतेच या चित्रपटाचे पोस्टर रिलीज करण्यात आले आहे.

त्याच्या आगामी चित्रपटाचे नाव ‘भांगरा पाले’ असे आहे. या चित्रपटाची निर्मिती रॉनी स्क्रुवालाने केली आहे. या चित्रपटाचा ट्रेलर देखील रिलीज करण्यात आला आहे. त्याच्यासोबत या चित्रपटात रुकसार धिल्लोन ही नवोदित अभिनेत्री भूमिका साकारणार आहे. तसेच यामध्ये श्रीया पिळगावंकरचीही भूमिका आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन स्नेहा तौरानी यांनी केले आहे.


नाटकांपासून सनी कौशलने त्याच्या अभिनयाची सुरुवात केली होती. त्याने ‘सनशाईन म्यूझिक टूर्स अँड ट्रॅव्हल्स’ या चित्रपटाद्वारे सिनेसृष्टीत पदार्पण केले होते. त्याने २०१६ साली एका शॉर्टफिल्ममध्येही भूमिका साकारली होती. तसेच त्याच्या वेबसीरिजही मोठी लोकप्रियता पाहायला मिळते. त्याच्या ‘लव्ह अॅट फर्स्टसाईट’ आणि ‘ऑफिशिअल चुकीयागीरी’ या दोन्हीही वेबसीरिज चाहत्यांच्या पसंतीस उतरल्या.


सहाय्यक दिग्दर्शकाचेही काम सनीने केले आहे. ‘गुंडे’ आणि ‘माय फ्रेंड पिंटो’ यांसारख्या चित्रपटासाठी त्याने सहाय्यक दिग्दर्शकाचे काम केले आहे. याशिवाय त्याने अक्षय कुमारच्या ‘गोल्ड’ चित्रपटात सहाय्यक अभिनेत्याची भूमिका साकारली होती. तो ‘हिम्मत सिंग’ या खेळाडूच्या भूमिकेत यामध्ये झळकला होता.


तो आता ‘भांगरा पाले’ या चित्रपटात मुख्य भूमिकेत पाहायला मिळणार आहे. प्रेक्षक त्याच्या या चित्रपटाला कसा प्रतिसाद देतात, हे पाहणे रंजक ठरेल. हा चित्रपट १ नोव्हेंबरला रिलीज होणार आहे.

Leave a Comment