शाहरुखच्या लेकीच्या पहिल्या चित्रपटाचा टीझर रिलीज


गेल्या बऱ्याच दिवसांपासून बॉलिवूडचा किंग खान शाहरुखची मुलगी सुहाना हिच्या बॉलिवूड पदापर्णाच्या चर्चा सुरू होत्या. सुहानाने अलिकडेच तिचे शिक्षणही पूर्ण केले आहे. आता ती न्यूयॉर्कमध्ये अभिनयाचे धडे गिरवत आहे. तिचा यासोबतच अभिनयातही डेब्यू झाला आहे. ती एका लघुपटामध्ये मुख्य भूमिकेत दिसणार आहे. नुकताच या लघुपटाचा टीझरही प्रदर्शित करण्यात आला आहे.

या लघुचित्रपटाचे नाव ‘द ग्रे पार्ट ऑफ ब्ल्यू’ असे आहे. सुहानाचा या चित्रपटातील पहिला लूक काही दिवसांपूर्वीच रिलीज करण्यात आला होता. तसेच, पहिले पोस्टरही तिने शेअर केले होते. आता तिच्या इन्स्टाग्राम पेजवर या लघुचित्रपटाचा टीझरही तिने शेअर केला आहे. तिच्या अभिनयाची झलक या टीझरमध्ये पाहायला मिळते. चित्रपटाचे दिग्दर्शन Theodone Gimeno हे करणार आहेत.


लंडनच्या ‘Ardingly College’ मधून सुहानाने आपले पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले आहे. बॉलिवूडमध्ये पदार्पणापूर्वीच सुहानाच्या बऱ्याच फोटोशूटची चर्चा असते. शाहरुखप्रमाणेच तिला अभिनयात आपली ओळख तयार करायची आहे. ती सध्या त्यासाठी मेहनत घेत आहे.

Leave a Comment