Video : फरहान अख्तरने शेअर केलेली या मुलीची कविता एकदा नक्की ऐका

अभिनेता फरहान अख्तर त्याच्या अभिनयाबरोबरच त्याच्या कवितांसाठी देखील ओळखला जातो. त्याचे आजोबा मुत्झर खैराबादी हे देखील प्रसिध्द उर्दु कवी होते. त्याचे वडिल जावेद अख्तर हे देखील आपल्या गाण्यांसाठी आणि कवितांसाठी प्रसिध्द आहेत. आज अभिनेता फरहान अख्तरने पल्लवी महाजन नावाच्या कवयित्रीची कविता इस्टाग्रामवर शेअर केली. विचार करण्यास प्रवृत्त करणारी कविता नक्कीच प्रत्येकाने बघायला हवी.

या कवितेचे नाव ‘सुकून की तलाश में’ असे असून, पल्लवी महाजन नावाच्या कवयित्रीने हे लिहिले व परफॉर्म केली आहे.

फरहान अख्तरने इंस्टाग्रामवर कविता शेअर करत लिहिले की, पल्लवी महाजनची ही सुंदर व विचार करण्यास प्रवृत्त करणारी कविता.

व्हिडीओ शेअर केल्यापासून आतापर्यंत 60 हजारांच्यावर लाईक्स आले आहेत, तर शेकडो कमेंट्स आल्या आहेत.

यावर व्हिडीओवर अभिनेता अर्जुन रामपालने देखील ‘ब्युटिफुल’ अशी कमेंट दिली. याशिवाय अनेक युजर्सनी देखील पल्लवी महाजनच्या या कवितेचे कौतूक केले.

ही कविता याआधी इनरवॉइसने युट्यूबवर अपलोड केली होती. युट्यूबवर या कवितेला 25 हजारांपेक्षा अधिक वेळा बघितले आहे.

Leave a Comment