नवाजुद्दिनच्या ‘बोले चूडिया’चा टीझर रिलीज


नवाजुद्दिन सिद्दीकीच्या आगामी चित्रपट ‘बोले चूडिया’ या चित्रपटाचा टीझर नुकताच रिलीज करण्यात आला आहे. नवाजुद्दीन सोबत या चित्रपटात अभिनेत्री तमन्ना भाटियाही मुख्य भुमिकेत झळकणार आहे.

नवाजुद्दीन सिद्दीकीला आत्तापर्यंत आपण मारामारी करताना पाहिले आहे. पण, नवाजुद्दीन यंदा पहिल्यांदाच एका प्रियकराच्या भुमिकेत आपल्याला दिसणार आहे. या चित्रपटाचा टीझर नवाजुद्दीनने आपल्या ट्विटर अकाऊंटवर शेअर केला आहे. सोबतच त्याने टीझरला ‘अब अपून को लाइफ में कोई लफड़ा नहीं चाहिए. बस रोमांस और फैमिली… #बोले चूडियां की पहली झलक’ असे कॅपशनही दिले आहे.

नवाजुद्दीनचा भाऊ शम्स नबाब सिद्दीकीने या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. त्यांचा हा दिग्दर्शक म्हणून पहिलाच चित्रपट आहे. तर या चित्रपटाचे निर्माते राजेश भाटिया आणि किरण जवेरी भाटिया हे आहेत. या चित्रपटाचे अधिकतर चित्रिकरण राजस्थानमध्ये करण्यात आले आहे. या चित्रपटात अगोदर ‘नागिन’ फेम मौनी राय मुख्य भुमिका साकारणार होती. मात्र, शेवटी तमन्नाला हे पात्र साकारण्यासाठी देण्यात आले.

Leave a Comment