‘डोला रे डोला’ गाण्यावर ‘धकधक गर्ल’सोबत ‘देसी गर्ल’ने धरला ठेका


लवकरच ‘द स्काय ईझ पिंक’ या चित्रपटातून बॉलिवूडची देसी गर्ल प्रियंका चोप्रा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. प्रियंका लग्नानंतर पहिल्यांदाच पडद्यावर पाहायला मिळणार असल्यामुळे या चित्रपटाची आतुरता चाहत्यांनाही आहे. या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये सध्या प्रियंका व्यस्त आहे. ती लवकरच ‘डान्स दिवाने’ या कार्यक्रमात हजेरी लावणार आहे. ती या कार्यक्रमाच्या एका प्रोमोमध्ये माधुरी दीक्षितसोबत ‘पिंगा’ गाण्यावर डान्स करताना दिसणार आहे.

माधुरी दीक्षितच्या नृत्याचीही प्रेक्षकांवर भूरळ पाहायला मिळत असल्यामुळे दोघींचाही धमाल डान्स या कार्यक्रमात पाहायला मिळणार आहे. दोघींनी देवदास चित्रपटातील ‘डोला रे डोला’ या गाण्यावरही ठेका धरला.


प्रियंका चोप्राचा ‘द स्काय इज पिंक’ हा चित्रपट येत्या ११ ऑक्टोबरला प्रदर्शित होणार आहे. प्रियंकाबरोबर या चित्रपटात फरहान अख्तर, झायरा वासिम दिसणार आहेत. प्रियंकाने या चित्रपटात झायराच्या आईची भुमिका केली आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन शोनाली बोस यांनी केले आहे. हा चित्रपट आता बॉक्स ऑफिसवर काय कमाल दाखवतो, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Leave a Comment