22 वर्षांनतर आईच्या पावलांवर पाऊल ठेवत प्रिंस हॅरीने केले हे काम

ब्रिटन प्रिंस हॅरीने भू-सुरूंगाद्वारे निर्माण होणारा धोक्याविषयी जागृकता पसरवण्यासाठी माइनफिल्डमधून असलेल्या जागेला भेट दिली व माइफिल्डमधून चालत देखील गेला. 22 वर्षांपुर्वी त्याची आई प्रिंसेस ऑफ वेल्स, डायनाने देखील असेच केले होते.

प्रिंस हॅरीने भू-सुरूंग भागातून चालताना अंगामध्ये चिलखत घातले होते. जुन्या अर्टिलेरी बेस कॅम्प असलेल्या डिरीको येथे त्यांनी भेट दिली. या साइटवर रेड वॉर्निंग देणारी चिन्ह देखील लावण्यात आली होती.

डायनाने देखील 1997 मध्ये अशाचप्रकारे माइनफिल्डमध्ये चालत संपुर्ण जगाचे लक्ष वेधले होते. डायनाने ज्या हालो ट्रस्ट या संस्थेबरोबर मिळून हे कार्य केले होते, त्यांच्याबरोबर प्रिंस हॅरीने माइनफिल्डला भेट दिली.

या संस्थेचे कर्मचारी ऑगस्टपासून या ठिकाणी काम करत होते. 2000 साली सरकार विरोधी संघटनांनी येथे भू-सुरूंग लावले होते.  आपल्या भेटीत यावेळी  प्रिंस हॅरीने अँटी-प्रर्सनल माइन देखील नष्ट केले.

आपल्या भाषणात प्रिंस हॅरी म्हणाले की, हालो ट्रस्ट या ठिकाणी शांतता प्रस्तापित करण्यासाठी कार्य करत आहे. यावेळी प्रिंस हॅरीला सुरक्षेसंबंधित सर्व माहिती देण्यात आली होती. तसेच लेन सोडून चालण्यास, धावण्यास व कशाला स्पर्श करण्यास देखील मनाई करण्यात आली होती.

Leave a Comment