कॅन्सरग्रस्तांसाठी केस दान करणाऱ्या पोलिसाचे अनुष्कानेही केले कौतूक

केरळमधील त्रिसूर जिल्ह्यातील इर्निजलकुडा येथील पोलिस अधिकारी अपर्णा लवकुमार यांनी कॅन्सग्रस्तांना विग बनवण्यासाठी आपले केस दान केले. कॅन्सरच्या रूग्णांसाठी त्यांनी आपल्या माथ्यावरचे सर्व केस कापले. त्यांच्या या कार्याचे अनेकजण सर्वचजण कौतुक करत आहेत. आता या यादीत बॉलिवुड अभिनेत्री अनुष्का शर्माचा देखील समावेश झाला आहे.

अनुष्का शर्माने इंस्टाग्रावर अपर्णा लवकुमार यांची स्टोरी शेअरी केले व त्यांच्या कार्याला सपोर्ट केला.

अपर्णा म्हणाल्या होत्या की, जेव्हा तुम्ही किमोथेरपी करता, तेव्हा केस गमवावे लागतात. मी मुंडन करून याचे समर्थन करू इच्छित होते.

46 वर्षीय अपर्णा यांनी सांगितले की, कॅन्सरशी लढा देणाऱ्या 5 वी च्या विद्यार्थीनीला भेटल्यावर मी आपले केस देण्याचा निर्णय घेतला. या मुलांना टक्कल केल्यामुळे त्रास दिला जातो. त्यांच्याबरोबर योग्य व्यवहार केला जात नाही.

त्या म्हणाल्या की, मी जे काम केले आहे ते खुप छोटे आहे. एक-दोन वर्षात माझे केस येतील. खरतरं, गरजू लोकांना अवयव दान करणाऱ्यांचे कौतूक केले पाहिजे.

Leave a Comment