तुम्ही पाहिला आहे डोनाल्ड ट्रम्प यांचा WWE च्या रिंगमधील कारनामा?


पुढील वर्षी अमेरिकेत राष्ट्रपती निवडणूक होणार असून नुकताच त्याच्या प्रचाराचा श्रीगणेशा करण्यात आला. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ह्यूस्टनमध्ये आयोजित ‘हाउडी मोदी’मध्ये ट्रम्प यांना पाठिंबा दिला. अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी या कार्यक्रमानंतर प्रचाराचे बिगुल फुकले. दरम्यान सोशल मीडियात सध्या राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा WWEच्या रिंगमधील एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. ट्रम्प या व्हिडीओत WWE चे मालक विन्स मॅकमहॉनला मारताना आणि त्याचे केस कापताना दिसत आहेत.

हा व्हिडीओ ट्रम्प यांच्या समर्थकांनी ट्विटरवर शेअर केला असून विरोधकांना मजेशीर अंदाजात वेळीच सावध होण्याचा इशारा देत आहेत. तसेच ट्रम्प यांच्या विरोधात जो कोणी उभा राहिल त्याची अवस्था अशीच काहीशी होईल असा संदेश ते या व्हिडीओतून देत आहेत. सध्या हा व्हिडीओ अमेरिकेत तुफान शेअर करण्यात येत आहे.

हा व्हिडीओ डोनाल्ड ट्रम्प राष्ट्रपती नसतानाचा आहे. 2007 साली डोनाल्ड ट्रम्प यांनी WWE WrestleMania 23 मध्ये वर्ल्ड रेसलिंग एण्टरटेनमेन्टचे मालक विन्स मॅकमहॉनला मारहाण केली होती. त्याच बरोबर त्यांचे केस कापून टक्कलही केले होते. विन्स मॅकमहॉनने Battle of the Billionaires सामन्यात रेसलर उमागावर पैज लावली होती. तर बॉबी लॅशलीवर डोनाल्ड ट्रम्प यांनी पैज लावली होती. सामन्यात सुरुवातीपासूनच चीटिंग करण्यात आली होती. विन्स मॅकमहॉनचा मुलगा शेन सामन्याचा रेफरी होता. शेन चुकीचे खेळतो आहे हे लक्षात आल्यावर स्टीव ऑस्टिन रेफरी म्हणून आला आणि तो सामना बॉबीने जिंकल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी विन्स मॅकमहॉनला रिंगमध्ये बसले आणि त्याचे टक्कल केले. आता 12 वर्षांनंतर पुन्हा एकदा हा व्हिडीओ व्हायरल झाला.

Leave a Comment