लेन कट करणाऱ्याला या महिलेने घडवली चांगलीच अद्दल

केरळमधील एका महिलेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. नेटकऱ्यांकडून या महिलेचे जोरदार कौतूक केले जात आहे. याला कारणही तसेच खास आहे.

केरळमधील एका रस्त्यावर बस चुकीच्या लेनमध्ये घुसताच, महिलेने आपली स्कूटर त्या बसच्या समोर उभी केली. बसच्या समोर स्कूटर घेऊन उभी असलेली ही महिला इंचभर देखील हल्ली नाही. कारण ती योग्य लेनमध्ये उभी होती. अखेर बस ड्रायव्हरलाच बस हलवत योग्य लेनमध्ये न्यावी लागते.

नेटकऱ्यांकडून या महिलेचे कौतूक केले जात आहे. सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल होत असून, 48 हजारांपेक्षा अधिक जणांनी हा व्हिडीओ बघितला आहे.

अनेकजण त्या महिलेच्या हिंमतीला दाद देत आहेत, तर अनेक जण तिला ‘बॉस लेडी’ म्हणत आहेत.

Leave a Comment