व्हिडीओ; महिला पोलिसाने कारच्या इंजिनमधून ओढून काढला साप

अमेरिकेतील मिशिगन येथील एका महिला पोलिस कर्मचाऱ्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. शेल्बी टॉवनशीप पोलिस ऑफिसर असलेल्या ऑटमन फेटिंग यांना बुधवारी रात्री कॉल आला की, गाडीमध्ये साप सापडला आहे. या महिला पोलिस कर्मचाऱ्याने घटनास्थळी दाखल होत न घाबरता अगदी सहजपणे पायथॉन सापाला गाडीच्या इंजिनमधून बाहेर काढले. या महिला पोलिस कर्मचाऱ्याच्या हिंमतीचे सोशल मीडियावर कौतूक केले जात आहे.

https://www.facebook.com/ShelbyTwpPolice/videos/2606864696031337/

शेल्बी टॉवनशीप पोलिस डिपार्टमेंटने या महिला पोलिस कर्मचाऱ्याचा व्हिडीओ फेसबुकवर शेअर केला. या व्हिडीओमध्ये दिसत आहे की, महिला अगदी सहजरित्या हाताने गाडीच्या इंजिनमध्ये अडकलेला साप काढत आहे व प्लास्टिकच्या डब्ब्यात ठेवत आहे.

व्हिडीओ शेअर केल्यापासून सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. आतापर्यंत 17 हजार पेक्षा अधिक जणांनी हा व्हिडीओ बघितला असून, शेकडो कमेंट्स देखील आल्या आहेत.

सोशल मीडियावर युजर्स या महिला पोलिस कर्मचाऱ्याचे हिंमतीचे कौतूक करत आहे. तर अनेकांनी त्या खरचं बहादूर आहेत असे म्हटले.

 

Leave a Comment