अमिताभ बच्चन यांचे मुंबई पोलिसांनी हटके अंदाजात केले अभिनंदन


नुकताच नामांकित दादासाहेब फाळके पुरस्कार बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांना जाहीर झाला आहे. अनेकांनी माहिती व प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांच्या घोषणेनंतर बिग बींवर शुभेच्छांचा वर्षाव केला. बिग बींचे मुंबई पोलिसांनीही हटके अंदाजात अभिनंदन केले आहे. मुंबई पोलिसांचे ट्विट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

मुंबई पोलिसांनी त्यांना त्यांच्या ‘जंजीर’ चित्रपटातील एक फोटो शेअर करुन शुभेच्छा दिल्या आहेत. अमिताभ यांनी या चित्रपटात ‘इन्स्पेक्टर विजय’ ही भूमिका साकारली होती. सर्वात सदाबहार, प्रेरणादायक व्यक्तिमत्व असलेल्या अमिताभ बच्चन यांना आम्ही वंदन करतो, अशा आशयाचे ट्विट मुंबई पोलीसांनी केले आहे.


अमिताभ बच्चन यांची यंदाच्या दादासाहेब फाळके पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. आजवर त्यांना बरेच पुरस्कार मिळाले आहेत. त्यांना अग्निपथ, ब्लॅक, पा आणि पिकू यांसारख्या चित्रपटासाठी राष्ट्रीय पुरस्कारही मिळाले आहेत. २०१५ साली त्यांनी देशाचा दुसरा सर्वोच्च नागरी पुरस्कार ‘पद्म विभूषण’ या पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले आहे.

Leave a Comment