जबरदस्त बॅटरी बॅकअपवाला शाओमीचा एअरडॉट्स लाँच

शाओमी कंपनीने चीनमध्ये झालेल्या इव्हेंटमध्ये एमआय एअरडॉट्स प्रो 2 लाँच केले आहे. याचबरोबर कंपनीने इव्हेंटमध्ये 50W एमआय पावरबँक 3 फास्ट चार्ज मॉडेल आणि  30W एमआय चार्ज टर्बो वायरलेस चार्जिंग स्टँड देखील लाँच केले आहे.

(Source)

एमआय एअरडॉट्स प्रो 2 चे स्पेसिफिकेशन आणि फिचर्स –

एमआय एअरडॉट्स प्रो 2 हे अॅपल एअरपॉड्स सीरिजापासून इंस्पायर्ड आहे. हे अॅपलप्रमाणेच व्हाइट चार्जिंग केस सोबत येते. यात ब्लूटूथ वर्जन 5.0 आणि एलडीएचसी हाय रेजोल्यूशन ऑडिओ सपोर्ट करते. एअरडॉट्स ड्युल मायक्रोन फोन सोबत येतात. जे वॉइस कंट्रोल आणि नॉइस कँसिलेशन फिचर सपोर्ट करते.

(Source)

14.2 एमएम ड्रायवर असणाऱ्या या एअरडॉट्समध्ये आवाज आणि ट्रॅक बदलण्यासाठी टच कंट्रोल सुविधा देखील देण्यात आली आहे. 4.5 ग्रॅम वजन असलेले हे डॉट्स अँड्राइड आणि आयओएस दोन्ही डिव्हाईसमध्ये सपोर्ट करतात. यामध्ये युएसबी टाइप-सी पोर्ट आहे. हे डॉट्स पुर्ण चार्ज होण्यासाठी केवळ एक तास लागतो. फुलचार्ज झाल्यावर चार तासांचा प्लॅबॅक टाइम आणि 14 तास स्टँडबाय टाइम मिळेल.

सध्या हा एअरडॉट्स चीनमध्ये लाँच करण्यात आला असून, चीनमध्ये याची किंमत 399 युआन (4000 रूपये) आहे. याची विक्री 27 सप्टेंबरपासून सुरू होईल.

(Source)

एमआय पॉवर बँक 3 50W स्पेसिफिकेशन आणि फिचर्स – 

एमआय पॉवर बँक 3 50W फास्ट चार्जिंग सपोर्ट करते. यामध्ये 20000 एमएएच बॅटरी कॅपेसिटी मिळेल. यामध्ये दोन युएसबी टाइप-ए पोर्ट आणि एक युएसबी टाइप सी पोर्ट मिळेल. यात एकाच वेळी तीन डिव्हाईस चार्ज करता येतील.

एमआय पॉवर बँक 3 50W ची किंमत 299 युआन (3000 रूपये) आहे.

Leave a Comment