‘हाऊसफुल ४’चे नवे पोस्टर तुमच्या भेटीला


नुकतेच अभिनेता अक्षय कुमार, रितेश देशमुख आणि बॉबी देओल यांच्या ‘हाऊसफुल ४’मधील लुकचे पोस्टर रिलीज केली होती. चित्रपटातील त्यांच्या या लुकनंतर आता चित्रपटातील सर्व कलाकारांची ओळख करुन देणारे नवे पोस्टर रिलीज करण्यात आले आहे. त्याचबरोबर चित्रपटाचा ट्रेलर कधी रिलीज होणार याची माहिती देखील देण्यात आली आहे.

या चित्रपटाचे नवे पोस्टर चित्रपट समीक्षक तरण आदर्श यांनी सोशल मीडियावर शेअर केले आहे. उद्या म्हणजेच २७ सप्टेंबरला चित्रपटाचा ट्रेलर रिलीज करण्यात येणार आहे.


प्रेक्षकांच्या ‘हाऊसफुल’, ‘हाऊसफुल २’ आणि ‘हाऊसफुल ३’ या चित्रपटांच्या यशानंतर ‘हाऊसफुल ४’ या चित्रपटाकडूनही फार अपेक्षा आहेत. या चित्रपटात अभिनेत्री क्रिती सेनॉन, पुजा हेगडे आणि क्रिती खारबांदा यांची देखील मुख्य भूमिका आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन फरहाद सामजी यांनी केले आहे. तर, या चित्रपटाची निर्मिती साजिद नादियाडवाला यांनी केली आहे. दिवाळीच्या पर्वावर हा चित्रपट रिलीज होणार आहे.

Leave a Comment