हृतिक-टायगरच्या ‘वॉर’चे अॅडव्हान्स बुकिंग सुरू


लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला अभिनेता हृतिक रोशन आणि टायगर श्रॉफ यांचा ‘वॉर’ चित्रपट येणार आहे. या चित्रपटाचे सध्या जोरदार प्रमोशन सुरू आहे. त्यातच आता या चित्रपटाचे अॅडव्हांस बुकिंग देखील सुरू झाले आहे. या चित्रपटाचे तिकिट २७ सप्टेंबर पासून बुक करता येणार आहे. मल्टीप्लेक्स आणि सिंगल स्क्रिन्ससाठी अॅडव्हांस तिकिट बुकिंग सुरू झाले आहे.


या चित्रपटात बॉलिवूडचे दोन अॅक्शन हिरो एकत्र येणार असल्यामुळे या चित्रपटाची चाहत्यांना उत्सुकता लागून राहिली आहे. काही दिवसांपूर्वीच रिलीज झालेले दोघांचा धमाल डान्स असलेले ‘जय जय शिवशंकर’ हे गाणे देखील सोशल मीडियावर हिट झाले आहे. यामध्ये अभिनेत्री वाणी कपूर देखील भूमिका साकारणार असल्यामुळेच ‘यशराज फिल्म्स’ने पाच दिवसांपूर्वीच या चित्रपटाच्या अॅडव्हांस बुकिंग सुरू केले आहे.

या चित्रपटाचे दिग्दर्शन सिद्धार्थ आनंद यांनी केले आहे. हा चित्रपट हिंदी, तेलुगू आणि तमिळ भाषेमध्ये प्रदर्शित होणार आहे. २ ऑक्टोंबरला हा चित्रपट रिलीज होणार आहे.

Leave a Comment