हा रोबाट पाहून बसणार नाही तुमचा तुमच्या डोळ्यांवर विश्वास


अमेरिकेची इंजिनिअरिंग आणि रोबोटिक्स डिझाईन करणारी कंपनी बॉस्टन डायनामिक्स ही वेगवेगळे रोबोट तयार करण्यासाठी प्रसिध्द आहे. आता या कंपनीने एटलास रोबोट तयार केला आहे. या एटलास रोबोटचे वैशिष्ट्य म्हणजे हा मनुष्याप्रमाणे चालतो, धावतो आणि पायऱ्या चढता. एवढेच नाही तर हा एटलास रोबोट जिम्नॅस्टिक्स देखील करतो. कंपनीने युट्यूबवर अपलोड केलेल्या 38 सेंकदाच्या व्हिडीओमध्ये हा एटलास रोबोट प्रोफेशनल जिम्नॅस्टिक्सप्रमाणे कलाबाजी करताना दिसत आहे. या रोबोटची उंची 4 फुट 9 इंच आहे तर वजन 176 पाउंड्स आहे. ज्याप्रमाणे हा रोबोट जिम्नॅस्टिक करतो, ते शिकायला एखाद्या मनुष्याला कितीतरी वर्ष ट्रेनिंग घ्यावी लागेल.

कंपनीने या एटलासमध्ये नवीन ऑप्टिमायजेशन एल्गोरिद्मचा वापर केला आहे, ज्याच्या मदतीने रोबोट अशाप्रकारची अवघड कामे करू शकतो. कंपनीनुसार, या एटलास रोबोटचा सक्सेस रेट 80 टक्के आहे.

युट्यूबवर या रोबोटचा व्हिडीओ अपलोड केल्यानंतर काही तासातच 1.5 मिलियन लोकांनी बघितला आहे, तर शेकडो कमेंट्स आल्या आहेत. युजर्सनी लिहिले की, आता मानवाचा काळ संपत आला असून, रोबोट आणि मशिन्सचा काळ सुरू झाला आहे.

2017 मध्ये अल्फाबेटकडून जापानच्या सॉफ्टबँकने बॉस्टन डायनामिक्स कंपनी खरेदी केली आहे. या कंपनीने याआधी स्पॉट, वाइल्डकॅट आणि बिगडॉग नाव असलेले चार पायांचे रोबोट्स देखील बनवले आहेत.

Leave a Comment