स्वतःहून ईडीचा पाहूणचार स्वीकारण्यासाठी जाणार – शरद पवार


मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी २७ सप्टेंबरला दुपारी २ वाजता मुंबईच्या ईडी कार्यालयामध्ये जाणार असल्याचे वक्तव्य केले. शरद पवार यांच्यावर ईडीने शिखर बँक घोटाळाप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. शरद पवार यांनी त्यांसदर्भात आज पत्रकार परिषद घेतली.

माझ्याविरोधात ईडीने गुन्हा दाखल केला आहे. पण माझी ईडीला पूर्णपणे सहकार्य करण्याची भूमिका असल्याचे पवार म्हणाले. तसेच माझा नक्की गुन्हा काय आहे? हे समजून घेणे गरजेचे असल्याचेही पवार म्हणाले. शरद पवार यांच्यावर ईडीने काल गुन्हा दाखल केला आहे. शरद पवार यांनी यांसदर्भात आज पत्रकार परिषद घेतली. ईडीला पूर्णपणे सहकार्य करणार असून, २७ सप्टेंबरला मी स्वत: मुंबईच्या ईडी कार्यालयात जाणार असल्याचे पवार म्हणाले.

Leave a Comment