खासदार मीमी चक्रवर्तीचे पहिले वहिले हिंदी गाणे रिलीज


‘क्रिएशन्स’ नावाच्या युट्यूब चॅनलवर खासदार आणि अभिनेत्री मीमी चक्रवर्तीचे पहिले वहिले हिंदी गाणे रिलीज करण्यात आले आहे. राजीव दत्ता आणि सोहम मजूमदार यांनी हे गाणे लिहिले आहे. तर हे गाणे स्वत: मीमी चक्रवर्तीने गायले आहे. फक्त आणि फक्त मीमीच 3 मिनिट 13 सेकंदांच्या या व्हिडीओमध्ये दिसते. तिला कधी डर्ट बाईकिंग करताना दाखवले आहे, तर कधी सुंदर ठिकाणी आपल्या अदा दाखवताना ती दिसते आहे. नुकत्याच रिलीज झालेल्या या गाण्याला 5 लाखाहून अधिक लोकांनी पाहिले आहे.

ड्रीम्स नावाच्या अल्बमचा हे गाणे भाग आहे. माझ्या स्वप्नांबाबतचे हे गाणे आहे. माझे पहिले गाणे ‘अंजाना’ आहे, हे माझ्यातील अनोळखी गोष्टींचा शोध घेण्याबाबत आहे. एका म्यूजिकल फॅमिलीतून मी येते, त्यामुळे मला गाणे हे आधीपासून आवडते. माझ्यासाठी माझा तणाव कमी करण्याचे हे काम करते. माझे ज्या गाण्यातून पदार्पण झाले होते ते गाणं लोकांना फार आवडले होते. त्यानंतर हिंदीमध्ये येण्याची ही योग्य वेळ असल्याचे मला वाटते, अशी माहिती मीमी चक्रवर्तीने इंडिया टूडेला दिलेल्या मुलाखतीत दिली.

मीमीने या गाण्यासोबतच तिचे युट्यूब चॅनललही लाँच केले. दुर्गा पुजा दरम्यान ती आणखी एक गाणे लाँच करेल, असेही तिने सांगितले. ते गाणे दुर्गा उत्सवावर आधारित असेल. मीमच्या या गाण्याला युट्यूबवर मिश्रित कमेंट्स मिळत आहेत. एकीकडे तिचे चाहते तिचे कौतुक करत आहेत. तर दुसरीकडे काही लोकांनी या गाण्याबाबत नकारात्मक कमेंट दिले आहेत.

Leave a Comment