फुटबॉल मॅचमध्ये गोलकिपरने 5 सेंकदात वाचवले दोन गोल, व्हिडीओ व्हायरल


इजिप्तच्या फुटबॉल प्रिमियर लीगमध्ये असे काही बघायला भेटले की, ज्याने सर्वचजण हैराण झाले. गोलकिपरने पाच सेंकदात दोन गोल वाचवले. गोलकिपरने केवळ 5 सेंकदात दोन गोल वाचवल्याने तेथे असलेले खेळाडू आणि प्रेक्षक देखील हैराण झाले. या गोलकिपरच्या चपळतेची सर्वत्र चर्चा होत आहे.

पिरेमिड्स संघाविरूध्द ईएनपीपीआयचा गोलकिपर महमूद गदीने हे दोन्ही गोल वाचवले.

पहिल्यांदा गदीने रिंगमधून बाहेर डोक्याने बॉलला दूर केले. तेवढ्यात दुसऱ्या खेळाडूने बॉल गोल पोस्टच्या दिशेने मारला. तेव्हा गोलकिपर खूप लांब होता. मात्र त्याने धावत येत, डोक्याने पुन्हा बॉलला दूर केले. सोशल मीडियावर या गोलकिपरचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

युजर्स मोहमूदचे कौतूक करत आहेत. फुटबॉल लीगमध्ये असा कारनामा पहिल्यांदाच बघायला मिळाला आहे.महमूदच्या या गोल वाचवण्याला आतापर्यंतचा सर्वात जबरदस्त डबल गोल सेव्ह असल्याचे सांगितले जात आहे.

Leave a Comment