लाल कप्तान या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज


अभिनेता सैफ अली खान हा आपल्या आगामी लाल कप्तान या चित्रपटामुळे खूप चर्चेत आहे. या चित्रपटाचे पोस्टर काही दिवसांपूर्वीच समोर आले होते. त्यानंतर आता या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज करण्यात आला आहे. सैफ या चित्रपटात नागा साधु बनला आहे आणि ट्रेलरमध्ये त्याचे खतरनाक रूप पाहायला मिळत आहे.

दमदार डायलॉगने या चित्रपटाच्या ट्रेलरची सुरूवात होते. सैफ ज्यात बोलतो की, आदमी के पैदा होते ही काल अपने भैंसे पर बैठके चल पड़ता है, उसे वापिस लाने। आदमी की जिंदगी उतनी, जितना समय लगा भैंसे को उस तक पहुंचने में। सैफ याचवेळी आपल्या चेहऱ्यावर राख लावताना दिसतो. त्यानंतर एक-एक खतरनाक दृश्य आणि त्याचसोबतच डायलॉग बघायला आणि ऐकायला मिळतात.

त्याचा त्यानंतर पुढचा एक सीन येतो. सैफ त्यात घोड्यावर बसलेला दिसतो आणि घोड्याच्या मागे एका मृत व्यक्तीला बांधून ओढत घेऊन जात असतो. सैफ पुढच्या एक सीनमध्ये आपल्या चेहऱ्यावर राख लावताना दिसतो त्याचा हा लूक अंगावर शहारे आणणारा आहे. या चित्रपटाचा ट्रेलर बघून दर्शकांना चित्रपटाची उत्सुकता लागुन राहिली आहे. 1 मिनिट 22 सेकंदांच्या या ट्रेलरमध्ये एका किलरच्या रूपात दिसणाऱ्या सैफ अली खानचा लूक परफेक्ट आहे.

सैफ अली खानचा हा चित्रपट एक पीरियड ड्रामा असणार आहे. त्याची भूमिका एक बघण्यासारखी असणार आहे. हा चित्रपट नवदीप सिंह यांनी दिग्दर्शित केला आहे.

Leave a Comment