व्हायरल होत आहे रायडर धोनीचा व्हिडीओ


महेंद्रसिंग धोनी सध्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून लांब आहे. भारतीय लष्करासोबत 1 महिना घालवल्यानंतर धोनी आपल्या रांचीच्या घरी परतला आहे. झारखंड आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये तो प्रॅक्टिस करताना दिसला. याच दरम्यान धोनीचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये धोनी सुपरबाइक चालवताना दिसत आहे. स्टेडियममधून बाहेर आल्यानंतर धोनी निंजा H2 (Ninja H2) बाईक चालवताना दिसला.

https://twitter.com/DHONIism/status/1176122969447231488

प्रॅक्टिस केल्यानंतर धोनी स्टेडियमच्या बाहेर आला. त्याच्या पाठीवर बॅग व हातात हेल्मेट होते. त्यानंतर धोनी बाइकवर बसून स्पीडमध्ये स्टेडियमच्या बाहेर निघून गेला. सोशल मीडियावर धोनीचा हा सुपरबाइक चालवतानाचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

https://twitter.com/IamOmkarAnpat/status/1175047179519582210

धोनीचा आणखी एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. यात तो लाल रंगाची कार चालवताना दिसत आहे. धोनीने काही दिवसांपुर्वीच जीप ग्रांड चेरोकी ट्रॅकहॉक कार (Jeep Grand Cherokee Trackhawk) घेतली आहे. रांचीला आल्यानंतर धोनीने ही गाडी चालवण्याचा आनंद घेतला.

Leave a Comment