लिनोवाचा ट्रिपल रिअर कॅमेरा असणारा स्मार्टफोन लाँच


चीनची स्मार्टफोन कंपनी लिनोवाने भारतात लिनोवा के10 प्लस हा स्मार्टफोन लाँच केला आहे. हा फोन तुम्ही 30 सप्टेंबरपासून फ्लिपकार्टवर खरेदी करू शकता. 30 सप्टेंबरला फ्लिपकार्टचा बिग बिलियन डेझ सेल देखील आहे.

लिनोवा के10 प्लस स्मार्टफोनची किंमत 10,999 रूपये आहे. हा स्मार्टफोन एकाच व्हेरिएंटमध्ये लाँच करण्यात आला असून, यामध्ये 4 जीबी रॅम आणि 64 जीबी इंटर्नल स्टोरेज मिळेल. कंपनीने ब्लॅक आणि स्प्राइट कलरमध्ये हा फोन लाँच केला आहे.

(Source)

या फोनमध्ये 6.22 इंच एचडी + डिस्प्ले आहे. तर क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 632 ऑक्टाकोर प्रोसेसरवर हा फोन चालेल. यामध्ये अँड्राइड 9 पाय ऑपरेटिंग सिस्टिम देण्यात आली आहे. यामध्ये Adreno 506 GPU आहे.

कॅमेऱ्याबद्दल सांगायचे तर यात ट्रिपल रिअर कॅमेरा देण्यात आला आहे. यात 13 मेगापिक्सल+8 मेगापिक्सल+5 मेगापिक्सल असे कॅमेरे आहेत. सेल्फीसाठी यात 16 मेगापिक्सल आर्टिफिशियल इंटेलिजेंसवर आधारित फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.

(Source)

या स्मार्टफोनमध्ये 4,050mAh बॅटरी मिळेल. सोबतच 10W फास्ट चार्जर देखील मिळेल.

Leave a Comment