सामन्यादरम्यान अमिताभ स्टाईलमध्ये गावस्करांनी विचारला हा प्रश्न

दक्षिण अफ्रिकेविरूध्दच्या तिसऱ्या व अखेरच्या टी20 सामन्यात भारतीय संघाला 9 विकेट्सने पराभव स्विकारावा लागला. सध्या या सामन्यातील सुनिल गावस्कर यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सामन्या दरम्यान कॉमेंट्री करत असताना सुनिल गावस्कर यांनी चक्क अमिताभ बच्चन यांचे अनुकरण केले.

कॉमेंट्री करत असताना गावस्कर यांनी ज्याप्रमाणे अमिताभ बच्चन कौन बनेगा करोडपती शोमध्ये प्रश्न विचारतात अगदी त्याचप्रमाणे ‘कोणता खेळाडू चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करू शकतो ?’ असा प्रश्न विचारला. यावेळी गावस्कर यांच्याबरोबर हर्षा भोगले देखील कॉमेंट्री करत होते.

बीसीसीआयच्या ट्विटर हँडलवर गावस्करांचा हा व्हिडीओ शेअर करण्यात आला.

सामन्याच्या 11 व्या ओव्हर दरम्यान स्क्रीनवर भारतीय संघाकडून टी20 मध्ये चौथ्या क्रमांकासाठी कोणता खेळाडू योग्य आहे ? असा प्रश्न आला. प्रश्नाबरोबरच श्रेयस अय्यर, मनिष पांडे, रिषभ पंत आणि केएल राहुल असे चार पर्याय देखील देण्यात आले होते.

हा प्रश्न वाचून गावस्कर देखील हा तर ‘कौन बनेगा करोडपतीचा प्रश्न आहे’, असे हसत हसत म्हणतात. हर्षा भोगले देखील यावेळी अमिताभ बच्चन यांची मिमिक्री करण्याचा प्रयत्न करतात.

Leave a Comment