आता बँक टाकणार तुमच्या खात्यात 100 रूपये, आरबीआयचा नवा नियम

आजही बँक ग्राहकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत असतो. अनेकवेळा ऑनलाइन ट्रांजेक्शन फेल होत असतात. त्यामुळे आता भारतीय रिझर्व्ह बँकेने ग्राहकांना चांगली सुविधा देण्यासाठी एक नवीन नियम लागू केला आहे. जर तुमचा ऑनलाइन व्यवहार कोणत्याही कारणामुळे होऊ शकला नाही आणि तुमच्या खात्यातून वजा झालेले पैसे तुम्हाला एक दिवसाच्या आत मिळाले नसतील. तर या नियमाबद्दल तुम्ही नक्की जाणून घेतले पाहिजे.

आरबीआयच्या नवीन नियमानुसार, ऑनलाइन व्यवहार फेल झाल्यानंतर जर ग्राहकांना एक दिवसाच्या आत पैसे परत मिळाले नाही तर बँक आणि डिजिटल वॉलेटला ग्राहकांना दर दिवसासाठी 100 रूपये पेनल्टी म्हणून द्यावे लागतील.

हा नियम यूनिफाइड पेमेंट्स इंटरफेस (UPI), इमिजिएट पेमेंट सिस्टम (IMPS), ई-वॉलेट्स, कार्ड-टू-कार्ड पेमेंट आणि नॅशनल ऑटोमेटेड क्लियरिंग हाउस (NACH) यांना लागू असेल.

केवळ डिजिटलच नाही तर नॉन-डिजिटल व्यवहारांवर देखील आरबीआयने एक मुदत निश्चित केली आहे. ऑनलाइन पेमेंट्स, एटीएम आणि माइक्रो एटीएमचे व्यवहार झाले नाही तर खात्यात पैसे येण्यासाठी 5 दिवसांची मुदत निश्चित करण्यात आली आहे.

आरबीआयच्या नियमामध्ये म्हटले आहे की, ही रक्कम लवकरात लवकर ग्राहकांच्या खात्यात जमा होणे गरजेचे आहे. ग्राहकांनी तक्रार करण्याची वाट पाहू नये.

Leave a Comment