VIDEO : रोहितने केली शिखर धवनची पोल खोल


भारतीय संघाने दक्षिण अफ्रिकेच्या विरुद्ध होत असलेल्या टी-20 मालिकेत 1-0 ने आघाडी मिळवली आहे. दरम्यान, रविवारी 22 सप्टेंबर रोजी बंगळुरूच्या चिन्नस्वामी मैदानावर भारत आणि अफ्रिका यांच्यात तिसरा आणि अखेरचा टी-20 सामना होणार आहे.

पावसामुळे पहिला सामना रद्द झाल्यानंतर दुसरा सामन्यात भारताने 7 विकेटने सोपा विजय मिळवला. भारतीय संघ सध्या तिसऱ्या टी-20 सामन्यासाठी जोमाने सराव करत आहे. यासगळ्यात धवन आणि रोहित शर्मा यांची जुगलबंदी सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे. सध्या सोशल मीडियावर भारताचे सलामीचे फलंदाज एकमेकांविरोधात व्हिडिओ शेअर करत आहेत.

आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर रोहितने धवनचा एक व्हिडिओ पोस्ट केला. या व्हिडिओमध्ये शिखर एकटाच बोलताना दिसत आहे.


हा व्हिडिओ पोस्ट करताना रोहितने, नाही,नाही..शिखर माझ्याशी बोलत नाही आहे. त्याचा एक काल्पनिक मित्र आहे. त्या मित्राशी कदाचित संवाद साधत आहे. आता त्याचे वय झाले असल्यामुळे त्याला असे काही होत आहे. का एवढे वेडे झाले आहेत जट्ट जी, असे कॅपशन लिहिले आहे. रोहितने या व्हिडिओमध्ये धवनला टॅगही केले आहे. शिखरने या व्हिडिओवर, मी शायरीची प्रॅक्टिस करत होतो आणि या महाशयांनी व्हिडिओ केला. मनापासून काही तरी आठवत होतो, मज्जा आली. असा अभ्यास जमला असता तर…, असे उत्तर दिले आहे. युवराज सिंग, शार्दूल ठाकूर यांनीही या व्हिडिओवर कमेंट केल्या आहेत.


शिखरने याआधी रोहित शर्माचा आपली मुलगी समायरासाठी खरेदी केलेली खेळणी आणि त्यासोबत रोहित कसा मोठा झाला आहे, असा मजेशीर व्हिडिओ पोस्ट केला होता. जडेजा आणि इतर खेळाडूंनी या पोस्टवर मजेशीर कमेंट केल्या होत्या. त्यानंतर याच व्हिडिओचा बदला म्हणून रोहितने धवनचा व्हिडिओ शेअर केला असावा.

Leave a Comment