पतीने सप्तपदी घेताना नववधूला पाडले तोंडघशी


देशातील अनेक राज्यांच्या विवाह पद्धती फारच वेगवेगळ्या असतात. वेगवेगळ्या जाती-धर्माचे लोक आपल्या देशात राहत असल्याने प्रत्येकाचे रितीरिवाज देखील वेगवेगळे असतात. प्रत्येक जाती धर्मातील लग्नाची एक खास गोष्ट असते. पण हे सर्व रितीरिवाज पार पाडताना काही गंमती-जमतीदेखील होताना दिसतात. पण आज आम्ही तुम्हाला सोशल मीडियात व्हायरल झालेला हा व्हिडीओ दाखवणार आहोत जो पाहून तुम्ही कपाळाला हात लावाल एवढे मात्र नक्की…

एका बंगाली लग्नाच्या विधी पार पडताना सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडीमध्ये दिसत आहेत. बंगाली लग्नात एक विधी असाही असतो की लग्नाच्यावेळी वराने वधूला उचलून घ्यावे लागते. पण या वधूला तिच्या होणाऱ्या पतीने उचलून घेतल्यानंतर जे काही घडले ते पाहून तुम्हाला देखील हसू आवरत येणार नाही. सध्या सोशल मीडियावर हा व्हिडीओ खूप व्हायरल होत आहे.

त्या नवरीची हा व्हिडीओ पाहिल्यावर काय अवस्था झाली असेल याचा विचार न केलेलाच बरा. असे काहीतरी लग्नासारख्या आनंदाच्या क्षण घडणे तिला अपेक्षित नसेलच पण लग्नाच्या गोड आठवणींची ज्यांना अपेक्षा असते त्या ठिकाणी या नवरीला हा प्रसंग कायम लक्षात राहिल.

Leave a Comment