रामायण प्रश्नाचे उत्तर माहित नसल्यामुळे ट्रोल झाली सोनाक्षी सिन्हा


लोकप्रिय टीव्ही क्विझ शो कौन बनेगा करोडपती ११ मध्ये हजेरी लावल्यानंतर दुसर्‍याच दिवशी शनिवारी सकाळी सोनाक्षी सिन्हा सोशल मीडियावर ट्रोल झाली. कारण रामायण संबंधित प्रश्नाचे उत्तर देण्यात सोनाक्षी अयशस्वी ठरली. केबीसी करमवीर भागात सोनाक्षी विशेष अतिथी म्हणून आली होती. जिथे तिने सामाजिक कार्यकर्त्या रुमा देवी यांना पाठिंबा दर्शविला. या जोडीला तब्बल Rs 12,50,000 रुपयांच्या बक्षिसाची रक्कम जिंकण्यात यश आले.


तथापि, रामायण संबंधित प्रश्नाचे उत्तर सोनाक्षीला माहित नसल्यामुळे नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले. शो दरम्यान प्रश्न विचारण्यात आला, रामायणानुसार हनुमानाने संजीवनी औषधी वनस्पती कोणासाठी आणली?” योग्य उत्तराविषयी अजिबात खात्री नसलेल्या सोनाक्षीने प्रथम सीता आणि राम यांचा अंदाज केला. तथापि, शेवटी अचूक उत्तर मिळविण्यासाठी (जे लक्ष्मण होते) विचारण्यासाठी तज्ज्ञांच्या हेल्पलाइनचा आसरा घेतला.


सोनाक्षी सिन्हाच्या या उत्तरावर स्वत: अमिताभ बच्चन यांनीही ‘रामायण’ हे त्यांच्या कुटूंबाचा अविभाज्य भाग असल्याचे म्हटले. ‘लव अँड कुश’ असे सोनाक्षी सिन्हाच्या भावांचे नाव आहे. मात्र, आता ट्विटरवर सोनाक्षी तिच्या उत्तरासाठी ट्रोल होत आहे. ट्विटरवर ‘यो सोनाक्षी सो डंब’ (#YoSonakshiSoDumb) हॅशटॅग ट्रेंड करत आहे.


मीमच्या माध्यमातून सोशल मीडिया युजर्स सोनाक्षीला ट्रोल करत आहेत. मात्र, यावर सोनाक्षीने अद्याप काही उत्तर दिलेले नाही.

Leave a Comment