Video : हा पोलीस कर्मचारी सांगत आहे चलान कमी करण्याच्या टिप्स


सध्या एका पोलिस कर्मचाऱ्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये पोलिस कर्मचारी चलान कापल्यावर कशाप्रकारे चलानची रक्कम कमी करता येईल त्याच्या टिप्स देत आहे. चलानच्या रक्कमेमध्ये दहापटीने वाढ झाल्याने वाहनचालकांमध्ये भिती आहे. 15 मिनिटांचा  हा व्हिडीओ फेसबुकवर व्हायरल झाला आहे. या पोलिस कर्मचाऱ्याने 5 हजारांचे चलान 100 रूपयांचे कसे करता येईल हे सांगितले आहे.

पोलिस कर्मचारी सुनील बंधूने सर्वात प्रथम ट्रॅफिकचे नियम तोडल्यावर किती दंड होईल ते सांगितले. त्यांनी सांगितले की, लायसेंस अथवा रजिस्ट्रेशन नसेल तर 5 हजार रूपये, पीयुसी नसेल तर 10 हजार रूपये, इंश्योरेंस नसेल तर 2 हजार रूपये दंड होऊ शकतो. अशा प्रकारे त्यांनी एक-एक चलानची संपुर्ण यादी वाचून दाखवली आहे.

त्यानंतर त्यांनी दंडाची रक्कम कमी करण्यासाठी काय करता येईल ते सांगितले. त्यांनी सांगितले की, जर तुम्ही कागदपत्र घरी विसरला असाल आणि चलान कापले असेल तर ते चलान तुम्ही 100 रूपये करू शकता.

22000 हजार का #चालान 400 में कैसे निपटाए

22000 हजार का #चालान 400 में कैसे निपटाए, इस पुलिस जवान ने एकदम सही सलाह दी है

Posted by Studfeed on Wednesday, September 11, 2019

संधू यांनी सांगितले की, कागदपत्रे सादर करण्यासाठी वाहनचालकाकडे 15 दिवसांचा कालावधी असतो. अशावेळी पुर्ण दंड न भरता तुम्हाला केवळ 100 रूपये द्यावे लागतील. समजा, तुमच्याकडे ड्रायव्हिंग लायसेंस, रजिस्ट्रेशन, पीयुसी आणि इंश्योरेंस नाही. तर नियमांनुसार तुमचे 22 हजारांचे चलान कापले जाऊ शकते. मात्र जर तुम्ही 15 दिवसात सर्व कागदपत्रे अधिकाऱ्यांना दाखवू शकत असाल तर तुम्हाला 100-100 रूपये दंड भरावा लागेल. म्हणजेच चार नियमांचे उल्लंघन केल्याने 400 रूपयांचे चलान द्यावे लागेल.

मात्र विना हेल्मेट आणि दारू पिऊन गाडी चालवण्यावर हे नियम लागू होत नाहीत.

फेसबुकवर मागील आठवड्यात शेअर करण्यात आलेल्या या व्हिडीओ तब्बल 9.7 मिलियन व्यूज आले आहेत. युजर्स ही माहिती देण्यासाठी सुनील बंधू यांचे आभार देखील मानत आहेत.

 

Leave a Comment