‘द स्काय ईज पिंक’मधील पहिले गाणे रिलीज


बऱ्याच दिवसानंतर पडद्यावर बॉलिवूडची ‘देसी गर्ल’ प्रियंका चोप्रा दिसणार आहे. ती फरहान अख्तरसोबत ‘द स्काय ईझ पिंक’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. प्रियंका बऱ्याच दिवसानंतर पडद्यावर झळकणार असल्यामुळे चाहत्यांना या चित्रपटाची आतुरता आहे. या चित्रपटाचा ट्रेलर काही दिवसांपूर्वीच रिलीज करण्यात आला होता. त्यानंतर आता प्रियंका आणि फरहानची रोमॅन्टिक झलक असलेले या चित्रपटातील पहिले गाणे रिलीज करण्यात आला आहे.

या गाण्याचे ‘दिल ही तो है’ हे बोल आहेत. या गाण्याला अरिजित सिंगच्या आवाजाने स्वरसाज चढवला आहे. त्याच्यासोबत अंतरा मित्रा हिने हे गाणे गायले आहे. या गाण्याला प्रितम यांनी संगीत दिले आहे. तर, या गाण्याचे बोल गुलजार यांनी लिहिले आहेत.

सध्या फरहान आणि प्रियंका चोप्रा दोघेही या चित्रपटाचे प्रमोशन करत आहेत. चित्रपटाच्या प्रमोशनसाठी प्रियंका मुंबईला परतली आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन शोनाली बोस यांनी केले आहे. प्रेरणादायी वक्ता असलेल्या आयशा चौधरीच्या जीवनावर आधारित या चित्रपटाची कथा आहे. यामध्ये अभिनेत्री झायरा वसिम आयशाची भूमिका साकारणार आहे. तर, प्रियंका चोप्रा आणि फरहान अख्तर दोघे तिच्या आईवडिलांच्या भूमिकेत दिसणार आहेत. ‘टोरान्टो फिल्म फेस्टिव्हल’मध्येही या चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळाला.

Leave a Comment