कच्च्या केळ्याचे सेवन अनेक विकारांवर उपयुक्त

banana
पिकलेली केळी आपल्या आहारामध्ये नेहमीच समाविष्ट असून, या फळाचे आपल्या आरोग्याच्या दृष्टीने असणारे फायदे आपल्या परिचयाचे आहेत. पोटॅशियम आणि क्षार मुबलक असणारे हे फळ पचण्यास हलके आहे. याच्या सेवनाने शरीरामध्ये त्वरित उर्जा उत्पन्न होत असते. म्हणूनच व्यायामापूर्वी एखादे केळे खाण्याचा सल्ला आहारतज्ञ देत असतात. पिकलेल्या केळ्यांप्रमाणे कच्चे केळे देखील भाजी, भजी, कोफ्ते इत्यादी पदार्थ बनविण्याकरिता वापरले जात असते. पिकलेल्या केळ्यांप्रमाणेच कच्च्या केळ्याचे सेवनही आरोग्याच्या दृष्टीने अतिशय फायदेशीर म्हटले जाते. कच्च्या केळ्यांमध्ये फायबर आणि हेल्दी स्टार्च असून, ही तत्वे आतड्यांमध्ये कोणत्याही प्रकारचे ‘ब्लॉकेज’ उत्पन्न होऊ देत नाहीत. त्याचमुळे ज्यांना बद्धकोष्ठाचा त्रास आहे, त्यांनी कच्च्या केळ्यांचा समावेश आहारामध्ये अवश्य करावा.
banana1
ज्यांना मधुमेह आहे, किंवा ज्यांना मधुमेह असल्याचे नुकतेच निदान झाले आहे, त्यांच्यासाठी कच्च्या केळ्याचे सेवन फायदेशीर आहे. याच्या सेवनाने शरीरातील ब्लड-शुगरची पातळी नियंत्रणात राहते. कच्च्या केळ्यामध्ये फायबरची मात्र मुबलक असून, याच्या सेवनाने पोट अधिक काळ भरलेले राहते, व त्यामुळे वारंवार भूक लागण्याची भावना होत नाही. याच्या सेवनाने पचनक्रियाही उत्तम राहते. त्यामुळे ज्यांना वारंवार अपचनाचा त्रास होतो, त्यांनी आपल्या आहारामध्ये कच्च्या केळयाचा समावेश अवश्य करावा.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment