सोशल मीडियावर व्हायरल होत आहे खासदार नुसरत जहां आणि मिमी चक्रवर्ती यांचा डान्स


दुर्गा पुजेला पश्चिम बंगालमध्ये खास महत्व असल्याचे आपल्याला माहितच आहे. खासदार आणि अभिनेत्री नुसरत जहां आणि मिमी चक्रवर्ती यांनी या महापर्वाच्या निमित्ताने काही दिवसांपूर्वीच दुर्गा पुजेच्या गाण्यावर डान्स केला आहे. सोशल मीडियावर या दोघींच्याही डान्सचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

यूट्यूबर आत्तापर्यंत या गाण्याला ९ लाखापेक्षा जास्त व्ह्युव्ज मिळाले आहेत. तर, फेसबुकवरही १० लाखापेक्षा जास्त लोकांनी हा व्हिडिओ पाहिला आहे. बंगाली सिनेसृष्टीतील नुसरत जहां आणि मिमी चक्रवर्ती दोघीही लोकप्रिय अभिनेत्री आहेत. या व्हिडिओत त्यांच्यासोबत अभिनेत्री सुभाश्री गांगुलीचाही डान्स पाहायला मिळतो. ३ ते ८ ऑक्टोंबरपर्यंत दुर्गा पूजेचे पर्व सुरू राहणार आहे. टॉलीवुड कंपोजर इंद्रदीप दास गुप्ता यांनी या गाण्याला कंपोज केले आहे.

काही दिवसांपूर्वीच नुसरत जहांने बंगाली चित्रपट साईन केला आहे. या चित्रपटाचे नाव ‘असुर’ असे आहे. या चित्रपटात बंगाली अभिनेता अबीर चॅटर्जी हा झळकणार आहे. तिने लोकसभेचे कामकाज सांभाळत प्रोफेशनल जबाबदारी देखील महत्वाचे असल्याचे म्हटले आहे. या चित्रपटाचे टीझर पोस्टरही सोशल मीडियावर तिने शेअर केले आहे. या चित्रपटाचे शूटिंग लवकरच सुरू होणार असल्याची माहिती तिने यामध्ये दिली आहे.

Leave a Comment