राजकुमार रावच्या ‘मेड इन चायना’चा ट्रेलर रिलीज


राजकुमार राव, परेश रावल आणि बोमन इराणी यांच्या भूमिका असलेल्या ‘मेड इन चायना’ चित्रपटाचा धमाल ट्रेलर रिलीज करण्यात आला आहे. या चित्रपटात मौनी राय, सुमित व्यास, अमायरा दस्तूर, मनोज जोशी आणि गिरीजा राव यांच्या धमाल व्यक्तीरेखा आहेत.

चित्रपटात अपयशी गुजराती व्यावसायिक रघु मेहता ( राजकुमार राव )आणि त्याची पत्नी रुक्मिणी ( मौनी राय ) यांची अत्यंत मस्त केमेस्ट्री पाहायला मिळणार आहे. रघु कसा यशस्वी उद्योजक होतो, तो कोणता जुगाड उद्योग करतो याची मजेशीर चित्रण ट्रेलरमध्ये पाहायला मिळते. ‘मेड इन चायना’चे दिग्दर्शन मिखील मुसळे यांनी केले आहे. दिनेश विजान यांची निर्मिती असलेला हा चित्रपट येत्या दिवाळीत २५ ऑक्टोबरला प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

Leave a Comment