जाणून घ्या सुनीता विलियम्स यांच्या विषयी रोचक माहिती


नासाच्या माध्यमातून अंतराळात जाणाऱ्या भारतीय वंशाच्या दुसऱ्या महिला सुनीता विलियम्स यांचा आज जन्मदिवस आहे. त्यांचा जन्म 19 सप्टेंबर 1965 ला युक्लिड, अमेरिका येथे झाला होता. त्यांनी महिला अंतराळवीर म्हणून 195 दिवस अंतराळात राहण्याचा विक्रम देखील केला आहे. त्यांचा संबंध गुजरातमधील अहमदाबादशी होता. त्यांचे वडिल दीपक पांड्या अमेरिकेत डॉक्टर आहेत.

मेसेच्युसेट्स येथून शालेय शिक्षण पुर्ण केल्यानंतर त्यांनी 198 मध्ये संयुक्त राष्ट्राच्या नौदल अकेडमीमधून फिकिल सायन्समध्ये पदवी घेतली. त्यानंतर 1995 मध्ये फ्लोरिडा इंस्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजीतून इंजिनिअर मॅनेजमेंटमध्ये एमएस केले.

(Source)

त्यांचे वडिल दीपक पांड्या हे प्रसिध्द डॉक्टर आहेत. ते गुजरातचे आहेत. त्यांच्या वडिलांनी 1958 मध्ये अमेरिकेत जाण्याचा निर्णय घेतला होता.

जून 1998 मध्ये सुनीता यांची नासामध्ये निवड झाली आणि प्रशिक्षण सुरू झाले. त्यांनी आतापर्यंत 30 वेगवेगळ्या अंतराळयानांमध्ये 2770 वेळा भरारी घेतली आहे. सप्टेंबर 2007 मध्ये त्यांनी भारत दौरा देखील केला होता. सुनीता या सोसाइटी ऑफ एक्सपेरिमेंटल टेस्ट पायलेट्स, सोसाइटी ऑफ फ्लाइट टेस्ट इंजिनिअर्स आणि अमेरिकी हॅलिकॉप्टर असोसिएशन या संस्थांशी देखील जोडलेल्या आहे.

(Source)

सुनीता यांचा विवाह मायकल जे विलियम्स यांच्याशी झाला असून, ते देखील अंतराळ क्षेत्राशी निगडीत आहेत. सुनिता यांना 2008 मध्ये भारत सरकारकडून विज्ञान आणि अभियांत्रिक क्षेत्रातील कामगिरीसाठी पद्म भूषण पुरस्कार देऊन देखील सन्मानित केले आहे. त्यांना आतापर्यंत नेव्ही कमेंडेशन मेडल (2), नेव्ही अँन्ड मरीन कॉर्प एचीवमेंट मेडल, ह्यूमॅनिटेरियन सर्विस मेडल अशा विविध पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे.

(Source)

अंतराळात जाणाऱ्या सुनीता या भारतीय वंशाच्या दुसऱ्या महिला असून, अंतराळाची ओढ असणाऱ्या तरूणाईसाठी त्या एक प्रेरणा स्रोत आहे.

Leave a Comment