अखेर रिलीज झाला बहुप्रतीक्षित सैरा चित्रपटाचा ट्रेलर


नुकताच दाक्षिणात्य सुपरस्टार्स, बॉलिवूड सुपरस्टार आणि दिग्गज स्टार्स यांचा दमदार अभिनय असलेल्या सैरा नरसिम्हा रेड्डी या ऐतिहासिक चित्रपटाचा ट्रेलर रिलीज करण्यात आला आहे. प्रेक्षकांमध्ये या चित्रपटाचे पोस्टर आणि टिझर रिलीज झाल्यानंतर चित्रपटाबद्दल कमालीची उत्सुकता प्रचंड वाढली होती. ही उत्कंठा ट्रेलर पाहून शिगेला पोहोचेल एवढे मात्र नक्की आहे.

ही कथा आंध्र प्रदेशातील एका लढाऊ योद्ध्याची आहे. या चित्रपटात भारतीय स्वातंत्र्य लढ्यात ब्रिटीशांविरुध्द एल्गार पुकारणाऱ्या स्वातंत्र्य सैनिकाची सत्यकथा दाखवली जाणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन सुरेंद्र रेड्डी यांनी केले असून राम चरण या चित्रपटाचा निर्माता आहे.

गेली ३ वर्षे या चित्रपटाचे शूटींग सुरू होते. हा एक बिग बजेट चित्रपट असून तब्बल ४५ कोटी रुपये यातील फाईटच्या एका सीनसाठी खर्च झाला आहे. यावरुन चित्रपटासाठी किती मेहनत घेतली गेली आहे याचा अंदाज येऊ शकतो. सुपरस्टार चिरंजीवी, के. सुदिप, विजय सेतुपती, जगपतीबाबू, नयनतारा, तमन्ना आणि अनुष्का शेट्टी यांच्या यात प्रमुख भूमिका आहेत. अमिताभ बच्चन यांची यात विशेष भूमिका असेल. २ ऑक्टोबरला हा चित्रपट रिलीज होणार आहे.

Leave a Comment