96 वर्षांच्या आजीबाई आहेत आशियातील सर्वात वयोवृध्द मॉडेल


हाँगकाँगच्या एलिस पँग या आशियातील सर्वात वयोवृध्द मॉडेल बनल्या आहेत. मॉडेल इंडस्ट्रीने त्यांना सर्वाधिक सिनियर मॉडेल म्हणून मान्यता दिली. याआधी जापानच्या नाओया कुडो (84) आणि चीनच्या वांग डेशन (84) या सर्वाधिक वयाच्या मॉडेल होत्या.

(Source)

96 वर्षांच्या एलिस सांगतात की, मला नवनवीन ड्रेस घालायला आवडतात. मात्र कधी विचार नव्हता केला की, मॉडेलिंग क्षेत्रात येईल. एलिस यांच्या नातीने एका 65 वर्षांच्या मॉडेलची जाहिरात बघितली आणि आजीचे फोटो पाठवून दिले. त्यानंतर एलिस यांची निवड झाली.

(Source)

त्या सांगतात की, मॉडेलिंग कोणत्याही चँलेजपेक्षा कमी नाही. मला काहीच माहिती नव्हते, मात्र मॅनेजरने सर्वकाही शिकवले. एलिस यांना आता या क्षेत्रात तीन वर्ष झाली आहेत.

(Source)

एलिस म्हणाल्या की, या वयातही लोकांना माझे काम आवडते, हे पाहून चांगले वाटते. मी स्वप्नातही कधी विचार केला नव्हता की, गुच्ची, वेलेंटिनो, एलेरी सारख्या ब्रँड्ससाठी मॉडेलिंग करेल. मात्र आयुष्यात अनेक अशा गोष्टी घडतात, ज्याचा आपण कधी विचारही केलेला नसतो.  आयोजकांना वाटते की, व्यायाम आणि स्ट्रिक्ट डाइट करते. मात्र असे काहीही नाही.

या वयात मॉडेलिंग करत असल्याने अनेक जण एलिस यांचे कौतूक करतात. तर काहीजण त्यांनी वयाप्रमाणे कपडे परिधान करावेत अशी देखील टीका करतात.