पॅरिसमध्ये लवकरच लाँच होणार ‘फ्लाईंग रिवर टॅक्सी’


भविष्यातील वाहतुकीचा विचार करून पॅरिसमध्ये फ्लाईंग इलेक्ट्रिक टॅक्सीचे परिक्षण करण्यात आले. ‘सी बबल्स’ नाव असलेल्या या फ्लाईंग टॅक्सीचा वेग ताशी 30 किलोमीटर आहे. तर पाण्यापासून 1.5 फूट उंचावरून चालते. जून 2017 मध्ये 4 प्रवाशांबरोबर महापौर एने हिडॅल्गो यांनी या फ्लाईंग टॅक्सची परिक्षण केले होते.

आयफेल टॉवर ते नॉट्रेडॅम कॅथ्रेड्रल हे अंतर सी बबल्स ने केवळ काही मिनिटात पुर्ण केले. 1980 च्या दशकात आलेल्या ‘बॅक टू द फ्युचर’ या चित्रपटातील डेलॉरेन कार प्रमाणे ही फ्लाईंग टॅक्सी दिसते.

(Source)

ही टॅक्सी कोणत्याही प्रकारचा आवाज निर्माण करत नाही. तसेच कार्बन डायोऑक्साइडचे देखील निर्माण करत नाही. फ्रेंच ट्रांसपोर्ट अधिकाऱ्यांकडून परवानगी मिळाल्यानंतर 2024 ला पॅरिसमध्ये होणाऱ्या ऑल्मिपिक गेम्समध्ये ट्रांसपोर्टसाठी ही फ्लाईंग कार महत्त्वाची भूमिका बजावेल.

या क्राफ्टच्या ऑपरेटरने सांगितले की, जिनिव्हा, मायामी आणि सेंट ट्रोपेझ या शहरातून देखील या फ्लाईंग टॅक्सीसाठी मागणी केली जात आहे.

सी बबल्सचे सीईओ आणि स्विडिश चॅम्पियन अँड्रेस ब्रिंगडल यांनी सांगितले की, 2020 च्या सुरूवातीला कमर्शियल ऑपरेशनसाठी वापर करण्यास सुरूवात केली जाईल.

Leave a Comment