राष्ट्रवादीची विधानसभा निवडणुकीसाठीची पहिली यादी जाहीर


बीड – राज्यातील सर्वच पक्षांनी विधानसभा निवडणुकीसाठी जोरदार तयारी सुरु केली असून निवडणुकीचा कार्यक्रम कधी जाहीर होईल याकडे लक्ष लागले आहे. दरम्यान निवडणुकीसाठी उमेदवारांची पहिली यादी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी जाहीर करुन टाकली आहे. शरद पवार यांनी बीडमध्ये बोलताना बीडमधील उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. यावेळी विधानपरिषद विरोधी पक्षनेते धनंजय मुंडेदेखील उपस्थित होते.

यादी जाहीर करताना शरद पवारांनी परळी मतदारसंघातून धनंजय मुंडे यांच्या नावाची घोषणा केली आहे. या मतदारसंघातून गेल्या निवडणुकीत पंकजा मुंडे यांचा विजय झाला होता. यामुळे यावेळी पुन्हा एकदा निवडणुकीच्या रिंगणात बहिण-भावाचा सामना रंगण्याची शक्यता आहे.

त्याचबरोबर गेवराई येथून विजयसिंह पंडित, केज येथून नमिता मुंदडा, बीडमधून संदीप क्षीरसागर, माजलगाव येथून प्रकाश सोळंके यांना उमेदवारी देण्यात आली आहे. शरद पवार यांनी ही पाच नाव जाहीर केली असून आष्टी मतदारसंघातील उमेदवार लवकरच जाहीर करु असे शरद पवारांनी सांगितले आहे.

Leave a Comment