व्हिडीओः चक्क गोरिला घेत आहे रग्बी खेळण्याचा आनंद


एका गोरिलाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. अमेरिकेतील डेवॉन येथील पँगटॉन प्राणी संग्रहालयातील एका गोरिलाचा रग्बी बॉलबरोबर खेळतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

व्हिडीओमध्ये दिसत आहे की, गोरिला रग्बी बॉलकडे उत्सुकतेने पाहत आहे व नंतर बॉल दुसरीकडे फेकतो. 37 वर्षीय पेर्टिनॅक्स गोरिलाचे वजन 190 किलो आणि उंची 6 फूट आहे.

जगातील सर्वात मोठे ऑनलाइन रग्बी स्टोर लव्हेल रग्बीने पँगटॉन प्राणी संग्रहालयाला हे रग्बी बॉल डोनेट केले आहेत.

गोरिलाला रग्बी बॉल खुपच आवडल्याचे व्हिडीओमध्ये दिसत असून, तो त्याच्याबरोबर खेळत आहे. सिनियर किपर एलेक्स पेरीने सांगितले की, पर्यावरण संवर्धनासाठी हा एक चांगला प्रकार आहे. गोरिलाला बॉल खूपच आवडला आहे. गोरिला आणि तिचे बाळ देखील या रग्बी बॉलबरोबर खेळत असते.

 

Leave a Comment