कार्तिक आर्यनही घेऊन आला आपला स्वतःचा यूट्यूब चॅनेल


यूट्यूब चॅनेल लाँच करण्याकडे सध्याच्या घडीला बॉलिवूड कलाकारांचा जर जास्तच कल वाढला आहे. काही दिवसांपूर्वीच अभिनेत्री आलिया भट्ट, दिशा पटाणी या दोघींनी आपले यूट्यूब चॅनेल लाँच केल्यानंतर आता त्यांच्या पाठोपाठ अभिनेता कार्तिक आर्यननेही आपला यूट्यूब चॅनेल लाँच केला आहे. याबाबतची माहिती त्याने सोशल मीडियावरुन दिली आहे.. हा व्हिडिओ शेअर करुन कार्तिकने त्याला ‘अनफिल्टर्ट, अनसेंसर्ड, अनस्क्रिप्टेड’, असे कॅप्शन दिले आहे.

कार्तिक या चॅनेलच्या माध्यमातून चाहत्यांशी संवाद साधणार आहे. या चॅनलच्या माध्यमातून त्याच्या चाहत्यांना आयुष्याशी निगडीत किस्से, त्याचे वैयक्तिक आयुष्य कसे आहे, हे पाहायला मिळणार आहे. शूटिंगदरम्यानची धमाल असलेला व्हिडिओ त्याने शेअर केला आहे.


लवकरच सारा अली खानसोबत कार्तिक ‘आजकल’ या चित्रपटात झळकणार आहे. त्याचबरोबर तो भूमी पेडणेकर आणि अनन्या पांडे यांच्यासोबतही ‘पती पत्नी और वो’ या चित्रपटाच्या रिमेकची तयारी करत आहे. नुकताच फर्स्ट लूक देखील चाहत्यांना पाहायला मिळाला आहे. त्यांनतर त्याची वर्णी ‘भूल भुलैय्या २’ या चित्रपटातही लागली आहे. तर ‘दोस्ताना’ चित्रपटाच्या सिक्वेलमध्येही तो जान्हवी कपूरसोबत भूमिका साकारताना दिसणार आहे.

Leave a Comment