शालेय विद्यार्थ्यांसाठी खिचडी बनवणाऱ्या अमरावतीच्या बबिता झाल्या करोडपती


सध्या पैसे जिंकण्याची संधी उपलब्ध करुन देणारा ‘कौन बनेगा करो़डपती’ हा रिअॅलिटी शो चांगलाच चर्चेत आहे. नुकतेच या शोच्या अकराव्या पर्वाचे स्पर्धक सरोज राज हे पहिले करोडपती झाल्यानंतर त्यांच्या पाठोपाठ आता अमरावतीच्या बबिता ताडे या देखील करोडपती झाल्या आहेत. बबिता यांचा व्हिडीओ सोनी वाहिनीकडून सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आला आहे.


शालेय विद्यार्थ्यांसाठी खिचडी बनवण्याचे बबिता या काम करतात. त्यांना या कामातून फारसे उत्पन्न मिळत नाही. फक्त दीड हजार रुपये एवढा पगार त्यांना मिळतो. एक सामान्य स्त्रीसुद्धा केबीसीच्या माध्यमातून तिचे स्वप्न पूर्ण करू शकते हे बबिता यांना सिद्ध करायचे होते आणि त्यांनी ते करून दाखवले आहे.

नेहमीच ‘केबीसी’ हा लोकप्रिय रिअॅलिटी शो ठरला आहे. टीआरपीच्या क्रमवारीत यंदाचे पर्वसुद्धा सतत वरच्या स्थानी राहिले आहे. आजवर अनेकांनी केबीसीच्या माध्यमातून त्यांची स्वप्ने पूर्ण केली आहेत. सोनी वाहिनीने पोस्ट केलेल्या या व्हिडीओत बबिता यांच्या संघर्षमयी प्रवासाची झलक दाखवण्यात आली आहे.

Leave a Comment