कॅन्सर रूग्णांसाठी खुशखबर, कीमोथेरेपीमध्ये नाही गमवावे लागणार केस

कॅन्सरच्या रूग्णांसाठी आनंदाची बातमी आहे. वैज्ञानिकांनी कॅन्सरवर इलाज करण्यासाठी नवीन पध्दत शोधली आहे. वैज्ञानिकांचा दावा आहे की, उपचारी ही नवीन पध्दत कीमोथेरिपी पेक्षा अधिक चांगली आहे. एवढेच नाहीतर वैज्ञानिकांनी असा उपाय शोधला आहे की, ज्यामुळे रूग्णांना कीमोथेरिपी दरम्यान केस गमवावे लागणार नाहीत.

कॅन्सरचा उपचार हा अवघड आणि खर्चिक असतो. मात्र वैज्ञानिकांनी आपल्या शरीरात एका बुडबुड्याचा शोध लावला आहे. ज्याद्वारे कॅन्सरवरील उपचार सोपा होणार आहे. वैज्ञानिकांचा दावा आहे की, हे बुडबुडे कीमोथेरिपीच्या तुलनेत कॅन्सरचा अधिक चांगल्याप्रकारे सामना करू शकतील. यांना एक्स्ट्रासेल्यूलर वेसिकल्स(ईवीएस) म्हटले जाते.

असे काम करते ही पध्दत –

आपल्या शरीरातील पेशी छोट्या-छोट्या आकारांचे बुडबुडे सोडतात. ज्या आनुवांशिक सामग्री जसे की, डीएनए आणि आरएनएला अन्य पेशींमध्ये स्थानांतरित करते. तुमचा डीएनए प्रोटीनचे उत्पादन करण्यासाठी आरएनएसाठी आवश्यक माहिती संग्रहीत करते व त्यानुसार कार्य करते. वैज्ञानिकांनुसार, आपल्या शरीरातील एक्स्ट्रासेल्यूलर वेसिकल्स औषध आणि जीनच्या मिश्रणांने कॅन्सर संपवते.

वैज्ञानिकांचा हा रिसर्च मॉलिक्यूलर कॅन्सर थेरोपिटिक्समध्ये प्रकाशित झाला आहे, जो उंदरांच्या स्तनांवरील कॅन्सरवर आधारित आहे. या रिसर्चचे प्रमुख लेखक मैसमित्सू कनाडा हे असून, ते मिशिगन स्टेट युनिवर्सिटीमध्ये असिस्टेंट प्रोफेसर आहेत.

या रिसर्चसाठी वैज्ञानिकांनी एंजाइम-जीनला वितरित करण्यासाठी एक्स्ट्रासेल्यूलर वेसिकल्सचा वापर केला. जे स्तन कॅन्सरच्या पेशींमध्ये गैनिक्लोविर आणि सीबी1954 नावाच्या औषधांच्या एकत्रित करण्याने काम करते.

वैज्ञानिकांनी कीमोथेरेपीमध्ये केस गळण्यापासून रोखण्यामध्ये मोठे यश मिळवले आहे. कॅन्सरमध्ये सर्वसाधारणपणे कीमोथेरेपी केली जाते. ज्यामुळे केस गळतात. संशोधकांनुसार, CDK4/6 इंहिबिटर नावाची औषध पेशींचे विभाजन रोखते. यामुळे केसांना कोणतेच नुकसान होत नाही. या औषधांना कॅन्सरवरील उपचारासाठी परवानगी देखील मिळाली आहे.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment